Skip to main content

Posts

बौद्ध समाजातील अतिशय ज्वलंत व महत्वाच्या विषयावर गांभीर्याने विचार करायला लावणारा तेलंगणा राज्यातील जयपाल वाघमारे या एका तरुण विचारवंताचा हा लेख प्रत्येकांनी आवर्जून वाचावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

बौद्ध समाजातील अतिशय ज्वलंत व महत्वाच्या विषयावर गांभीर्याने विचार करायला लावणारा तेलंगणा राज्यातील जयपाल वाघमारे या एका तरुण विचारवंताचा हा लेख प्रत्येकांनी आवर्जून वाचावा.  🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 ______________________________________ ज्यांना समाजात तथागत बुद्धाच्या व बाबासाहेबांच्या विचारांने खरचं परिवर्तन व्हावे असे वाटते त्यांनी बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारांचा अगोदर स्वतःच्या जीवनात अंगीकार करावा मगच इतरांना ज्ञान सांगण्याचा प्रयत्न करावा. कारण स्वतः अंगीकार न् करता केवळ इतरांना कोरडे ज्ञान सांगण्याला कवडीचाही अर्थ राहत नाही. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण गांभीर्याने समजून घेणे व यावर निष्पक्षपणे चर्चा होणे ही काळाची गरज आहे. 📘📗📕📙📘📗📕📕📘📗📕📙📘 तथागत बुद्धांच्या व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा बारकाईने अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते की, या दोन्ही महामानवांनी आपल्या ज्ञानाने, आपल्या कार्याने संपूर्ण जगावर प्रभाव पाडला. जगाच्या कानाकोपऱ्यात बुद्धविचार पोहचला व बाबासाहेबांचा विचारही आज झपाट्याने जगात पुढे जात आहे. या दोन्ही महामानवांकडे...
Recent posts

समाजसेवा, समाजकारण या गोंडस नावाखाली आपल्या समाजातील तरूणांकडून होणारी चमचेगिरी व चमकोगिरी आणि त्याचे स्वरूप.

सध्याच्या वर्तमान राजकारणात कार्यकर्त्याची असलेली अवस्था. पुर्वी अज्ञानी व देवभोळे लोकं देवाधर्माचे भक्त असायचे. परंतु आज आपल्या समाजातील तरुण आपल्या आसपासच्या नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा भक्त झाला आहे. आसपासचे आमदार, खासदार, पंचायत समित्यांचे सभापती, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, गल्लीबोळातील नेते, कार्यकर्ते, 'आमचे आण्णा', 'आमचे भाऊ', 'आमचे मित्र', 'हमारे भय्या', 'उभरतं नेतृत्व', खंबीर नेतृत्व यांचा तो भक्त झाला आहे. सोशल मीडियावर तर अशा भक्तांचा अक्षरशः उत आलाय. ना विचार, ना ध्येय, ना कोणत्या गोष्टीचे यथोचित ज्ञान, ना स्वाभिमान. यापैकी जवळ काहीच नसताना समाजातले तरुण कुणाचे ना कुणाचे भक्त होऊन सोशल मिडीयावर चमकोगिरी आणि चमचेगिरी करताना सर्रासपणे दिसून येत आहेत. ही परिस्थिती केवळ एक-दोन गावची तालुक्याची, जिल्ह्याची किंवा विशिष्ट अशा एका जातीतल्या तरूणांची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची, देशाची आहे. सर्वत्रच ह्या अशा अंधभक्ताचाच सुळसुळाट झाला आहे. ही भक्त मंडळी समाजकार्याच्या नावावर चमकोगिरी करत असतात. हीच त्यांची समाजसेवा. समाजसेवेच...

My upcoming book on Indian Constitution "The Ambedkar's Law & his Ideology" on the occasion of upcoming Buddha Jayanti;. By-Adv.K.T.Chaware

I wish you very happy Quasquicentennial (130th) Birth Anniversary of BabaSaheb Dr.Ambedkar! Friends ! I am delighted to introduce this volume of essential principles of Ambedkarism-compiled and edited by our brilliant lawyer and the editor of this book  Adv.K.T. Chaware  Friends, this volume covers the essential principles of Baba Saheb Dr.Ambedkar right from the beginning of the Era of Ambedkarism in  1920  to mass conversion to Buddhism by  Dhamma - Deeksha  in 1956 at Nagpur.  Though, the present volume does not classify these principles into various fields and subjects of Ambedkarite thought,  the same would be rectified in the future edition of this important book. However, these principles of Ambedkarism covers the Idea of Liberation from slavery, Constitution and Constitutionalism, Law and Democracy, Politics and Hero Worship, the Solution of Political Power and means to appropriate it, Hindu Religion of hatred, contempt, inhuma...

एड.रमेश एस.उमरगे (अण्णा) समाजसेवा हीच ईश्वरसेवा मानून केवळ आदर्श विचारच नव्हे तर त्या विचारावर प्रत्यक्ष चालणारं व प्रचंड सकारात्मक उर्जा लाभलेलं एक आदर्श व्यक्तीमत्त्वं!

एड.रमेश एस.उमरगे (अण्णा) समाजसेवा हीच ईश्वरसेवा मानून केवळ आदर्श विचारच नव्हे तर त्या विचारावर प्रत्यक्ष चालणारं व प्रचंड सकारात्मक उर्जा लाभलेलं एक आदर्श व्यक्तीमत्त्वं! "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित. तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे". या महान कवितेतील उक्तीप्रमाणे आपल्या जीवनाची नौका चालवणारं एक आदर्श व्यक्तीमत्त्वं म्हणजे 'एड.रमेश एस. उमरगे' (अण्णा). ही कविता आम्हाला आमच्या बालपणी शालेय जीवनात शिक्षकांनी शिकवली होती. तेव्हा कवितेचा अर्थ, मतितार्थ कळाला नाही. परंतु जसे जसे वय वाढत जाऊन माणसाच्या बौद्धिक क्षमतेत वृद्धी होते. तसे त्यांना लहानपणी त्याच्यावरील झालेल्या संस्काराचा, चांगल्या गोष्टीचा अर्थ कळू लागतो. हा अर्थ कळण्यासाठी माणसाच्या केवळ वयातच वृद्धी व्हावी लागते असे नाही तर त्याला जीवन जगत असताना बरे वाईट अनुभवही यावे लागतात. तेव्हा कुठे अशा कवितांचा खरा अर्थ असो किंवा एखाद्या महान संतांच्या उक्तींचा, कवनांचा, शास्त्रातील सिद्धांताचा, महापुरूषांच्या विचारांचा अर्थ खरा अर्थ कळतो. त्यानंतरच मग प्रत्य...

भारताच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात मोठी केस (प्रकरण) केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य! महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाला मानणाऱ्या प्रत्येकांनी ही केस वाचावी!

मित्रांनो आज आपण भारताच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात महत्त्वाची केस म्हणजेच  केशवानंद भारती   ही केस जाणून घेणार आहोत व त्यासोबतच आपल्या भारतीय संविधानाची मुळ चौकट ( Basic Structure )  समजून घेणार आहोत. केशवानंद भारती  ही केस आपल्यापैकी बहुतांश जणांना माहिती असेल किंवा असं सुद्धा होऊ शकते की काही कारणांमुळे माहिती नसेलही.कारण आपल्या देशात कायद्याच्या बाबतीत म्हणावी तशी विशेष जनजागृती होत नाही.आपला कायदा हा अतिशय सुंदर व सर्वोच्च आहे परंतु त्याबद्दलची जागृती होताना दिसत नाही. भारतीय संविधान हे जगात श्रेष्ठ आहे ही गोष्ट सर्व जग मानते.एवढं सुंदर व परिपूर्ण संविधान जगात कुठेही नाही.परंतु हे संविधान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचं कार्य होताना दिसत नाही.संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं काम आतापर्यंत कोणत्याही सरकारने केलेले नाही.वस्तुतः ही सरकारचीच मुख्य व प्राथमिक जबाबदारी आहे. आज भारतामध्ये अनेक विद्यापीठे व त्याअंतर्गत येणारे हजारो सरकारी,खाजगी महाविद्यालये,शाळा,संस्था आहेत ज्यामध्ये ते भारतीय संविधानाचं,राज्यशास्त्राचं,नागरिक शास्त्राचं शिक्षण...

जाणून घ्या न्यायालयाचे प्रकार,दिवानी स्वरूपाचे खटले,लोकन्यायालय,मध्यस्थी केंद्र व अजून बरेच काही कायदेविषयक उपयुक्त ज्ञान.

जाणून घ्या न्यायालयाचे प्रकार,दिवानी स्वरूपाचे खटले,लोकन्यायालय,मध्यस्थी केंद्र व अजून बरेच कायदेविषयक अतिशय उपयुक्त ज्ञान. मित्रांनो भारतीय न्यायालयीन व्यवस्था ही आपल्या देशाच्या भारतीय संविधानानुसार चालते. आपली न्यायपालिका ही आपल्या देशाच्या चार आधारस्तंभापैकी एक आहे. परंतु आपल्या समाजात आजही या लोकशाहीच्या सर्वात महत्त्वाचा स्तंभ मानल्या जाणाऱ्या न्यायपालिकेबाबत अतिशय निराशा व उदासीनता आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते.या उदासीनतेचे कारणे अनेक आहेत.कोणी म्हणतात न्यायव्यवस्था ही अतिशय भ्रष्ट झालेली आहे,कोणी म्हणतात न्यायव्यवस्था ही एका विशिष्ट प्रकारच्या वर्गाची मक्तेदारी झालेली आहे.कोणी म्हणतात की न्यायव्यवस्थेवर आमचा अजिबातच विश्वास नाही,तर कोणी म्हणतात ही न्यायव्यवस्था अतिशय धीम्या गतीने चालते,तर कोणी म्हणते आपल्या न्यायव्यवस्थेत अतिशय मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतो.इत्यादी प्रकारचे गंभीर स्वरूपाचे आरोप जनता करत असते.परंतु जी लोक न्यायव्यवस्थेवर टिका करतात, वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करतात त्या लोकांनी कधी आपली न्यायालयीन व्यवस्था समजून घेतली आहे का?हा प्रश्न ज्यांनी कायदाचं एक अक्षर...

जाणून घ्या कोणतेही शाशकिय,निमशासकीय काम किती वेळेत,किती कालावधीत झाले पाहिजे याचे नियम व कायदा.

जाणून घ्या कोणतेही शाशकिय,निमशासकीय काम किती वेळेत,किती कालावधीत झाले पाहिजे याचे नियम व कायदा. मित्रांनो आपण बहुतांश वेळा अशी तक्रार करतो की,आमचे कोणतेही सरकारी काम वेळेवर होत नाही.आम्ही सरकारी कार्यालयात खूप चक्करा मारत असतो तरीही सर्व कायदेशीर बाबी पुर्ण करून आमचे काम का होत नाही.असे का होते असा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात निर्माण होतो.परंतु आपण हे समजून घेतले पाहिजे की कोणत्याही प्रकारचे शाशकिय,निमशासकीय कामाचा, न्यायालयीन कामाचा ठराविक असा कालावधी असतो.त्यासाठी वेगवेगळे नियम व वेगवेगळ्या प्रकारचे कायदे असतात.कोणतेही शाशकिय,कार्यालयीन कामकाज त्या त्या कायद्याप्रमाणे चालत असते.म्हणून या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहीत असणे अत्यंत आवश्यक व गरजेचं आहे. ही माहिती देण्याचा माझा जो उद्देश आहे तो असा की सामान्य जनतेला आपल्या मराठी भाषेत या कायदेशीर संकल्पना समजाव्यात व सरकारी कामाबाबत जनतेच्या मनात कसलाही गैरसमज राहू नये हा आहे आणि जर एखादे काम वेळेत पूर्ण झाले नाही तर त्यासाठी कुठे व कोणाकडे तक्रार दाखल करायची इत्यादी गोष्टी जनतेला माहिती करून देणे हा आहे.याचा फायदा सुशिक्षित वाच...